Black Tomato: काळ्या टमाट्याची शेती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा करून देऊ शकतो. या टमाट्याची कशी लागवड करायची ते आम्ही या लेख मध्ये सविस्तर सांगणार आहोत. ज्याद्वारे शेतकरी बांधव भरघोस नफा मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया काळ्या टोमॅटोची लागवड संपूर्ण माहिती.
काळ्या टमाट्याचे महत्व
काळ्या टमट्याला सुपर फूड म्हणतात, याचे कारण आहे, यामध्ये असलेल्या न्यूट्रियन्समुळे, गेल्या काही वर्षांमध्ये काळ्या टोमॅटोच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. काळ्या टोमॅटोला युरोपियन बाजारपेठेत सुपर फूड म्हटले जाते आणि भारतातील हवामान देखील काळे टोमॅटो शेतीसाठी योग्य आहे.
भारतातील बाजारपेठेमध्ये काळे टोमॅटो आले आहेत. त्याला इंडिगो रोज टोमॅटो असेही म्हणतात. काळ्या टोमॅटो ची पहिली लागवड इंग्लंडमध्ये झाली होती. जगभरात मध्ये या टोमॅटोची लागवड केली जात आहे. त्यानंतर आता भारतातही टोमॅटो प्रसिद्ध होत आहेत.
अशी करा काळा टमाट्याची लागवड
या टोमॅटोची लागवड करण्यासाठी तुम्हाला माती परीक्षण करून घ्यायचा आहे. जर तुमच्या मातीचा पीएच व्हॅल्यू 6.5 असेल तर अशा प्रकारच्या जमिनीमध्ये हे टोमॅटो उत्तम प्रकारे येतात. तर काय टोमॅटोची पेरणी करण्यासाठी जानेवारी महिना हा सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये या काळया टोमॅटोची लागवड केली, तर त्याचे उत्पादन तुम्हाला मार्च-एप्रिल पर्यंत मिळू शकते. या टोमॅटोचे उत्पादन लाल टोमॅटो पेक्षा थोडे उशिरा येते. हे टोमॅटो उन्हाळ्यात येत असल्यामुळे तुम्हाला याचा योग्य प्रकारे भाव भेटू शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा भेटू शकतो.
काळ्या टोमॅटो लागवडीसाठी येणारा खर्च
शेतकरी बांधवानो काळ्या टोमॅटोच्या लागवडीच्या खर्चाबद्दल जर बोलायचं झाले तर, एक एकर काळ्या टोमॅटोची लागवड करण्यासाठी सुमारे तुम्हाला 20 ते 30 हजार रुपये येतो. तर याचे उत्पादन हे बाजारात असलेल्या भावावर अवलंबून असते, योग्य भाव मिळाला,तर यापासून तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये एकरी मिळू शकतात. साधारणपणे एक एकर मध्ये सुमारे दोनशे क्विंटल काळे टोमॅटो तयार होतात आणि या टोमॅटो बाजारात पन्नास रुपये जरी भाव भेटला तरी ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरते.
काळ्या टोमॅटोचे आरोग्यासाठी फायदे
काळे टोमॅटो हे आरोग्यासाठी सर्वोत्तम टोमॅटो मानले जातात. काळ्या टोमॅटो मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. काळा टोमॅटो जरी बाहेरून काळा दिसत असेल, तर आतून तो लाल असतो.
जर तुम्ही हा टोमॅटो कच्चा खात असाल, तर हा चवीला इतका आंबट नसतो. तो चवीला काहीसा खारट असतो.मीडियाचा रिपोर्टनुसार वजन कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी, रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे टोमॅटो अत्यंत उपाय कारक आहेत.
सारांश
सध्या हे टोमॅटो जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. जर शेतकऱ्यांनी याची लागवड महाराष्ट्र मध्ये सध्या केली. तर त्याला एक उत्तम भाव भेटू शकतो, कारण सध्या मार्केटमध्ये इतके काळे टोमॅटो नाहीत. ग्राहकांनाही याचे अनेक फायदे आहेत ,त्यामुळे ग्राहक या टोमॅटो कडे जास्त आकर्षित होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे टोमॅटो लावण्याचे प्रयत्न नक्की करावे.
हा लेख तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की इतरांशी शेअर करा. व कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्हाला अशाच कुठल्या नवनवीन पिकांचे माहिती हवी आहे ते कमेंट मध्ये सांगा.
जर तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने शेती करायची असेल तर त्याला आवश्यक असलेले साधने आणि मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही शेतकरी मित्र निखिल तेटू[+919529600161] यांच्याशी संपर्क साधू शकतात. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य तुम्हाला घरपोच मिळेल.