Electrical tractor : सध्या वाढलेल्या डिझेलच्या, पेट्रोलच्या किमतीमुळे जर तुम्ही शेतीसाठी इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर खरेदीचा विचार करत असाल,तर आज तुम्हाला भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर ची माहिती या लेखामध्ये देणार आहोत. जे ट्रॅक्टर डिझेलची बचत ही करतात व शेतकऱ्यांच्या शेतीची कामेही सोपे करतात.
भारताच्या अनेक राज्यांमध्ये सध्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर सुरू झालेला आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होते. कारण हे ट्रॅक्टर इलेक्ट्रिक लाईट म्हणजेच विजेवर चालते. यामध्ये बॅटरी असते,जे लाईटवर चार्जिंग होते. आता हे पाच ट्रॅक्टर कोणते आहेत ते पाहू.
1ऑटोनेक्सट X45H2 ट्रैक्टर
ऑटोनेक्सट X45H2 या ट्रॅक्टर मध्ये 32KW क्षमतेची शक्तिशाली बॅटरी असते. जी 45 एचपी पावर निर्माण करते. ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता आहे 1800 किलो इतकी ठेवण्यात आली आहे. म्हणजेच यामध्ये तुम्ही 1800 किलो पर्यंत वजन वाहून नेऊ शकतात.ऑटोनेक्सट या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला स्मार्ट पावर इलेक्ट्रिक कंट्रोल पावर स्टेरिंग पाहायला मिळेल, या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला आठ तास नॉर्मल चार्जिंग दोन तास हे फास्ट चार्जिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.हा कंपनीचा 2WD इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर आहे, याचे टायर पण मोठे देण्यात आलेले आहेत.ऑटोनेक्सट X45H2 या ट्रॅक्टर ची किंमत 6.42 लाख ते 6.75 ठेवण्यात आलेली आहे.
2.सोनालिका इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर
सध्या भारतामध्ये हा सर्वात लोकप्रिय ट्रॅक्टर आहे. सोनालिकाच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला 25.5 KW बॅटरी असलेली एक मोठी शक्तिशाली मोटर पाहायला मिळेल, जी या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला 15 HP पावर जनरेट करते. हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 500 किलो लोडिंग क्षमतेसह येतो. आणि 1420 MM व्हीलबेस मध्ये तयार केला जातो. या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 6 फॉरवर्ड +2 रिव्हर्स गिअरबॉक्स आहेत. ज्यामध्ये मेकॅनिकल स्टेरिंग आहे. हा इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर दहा तासाच्या सामान्य चार्जिंग मध्ये आणि चार तासाच्या फास्ट चार्जिंग मध्ये पूर्ण चार्ज होऊ शकतो. सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ची ट्रॅक्टर ची किंमत 2024 मध्ये 5.90 ते 6.22 लाख रुपये शोरूम ठेवण्यात आलेली आहे.
एचएवी 45 एस 1 ट्रैक्टर
या कंपनीच्या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला शक्तिशाली 4TNV84 हे इंजिन पाहायला मिळेल. जे या ट्रॅक्टरला 44 HP पावर जनरेट करून देते आणि तीन हजार आरपीएम जनरेट करते. बॅटरी पॅक शिवाय एकमेव हायब्रीड ट्रॅक्टर आहे. म्हणजे यामध्ये अनेक इंधन पर्यायावर चालण्याची क्षमता आहे. हा HV 45 S1 ट्रॅक्टर 1800 किलो लोडिंग क्षमतेसह येतो आणि 2000 MM व्हीलबेसमध्ये तयार केला जातो. या ट्रॅक्टर मध्ये मॅक्स कव्हर टाईप स्टेरिंग देण्यात आलेली आहे. HAV 45 S1 ट्रॅक्टर 4WD ड्राईव्ह मध्ये येते. भारतातल्या ट्रॅक्टरची किंमत 8.50 ठेवण्यात आलेली आहे.
4 सेलस्टियल 55 एचपी ट्रैक्टर
सेलस्टियल कंपनी हा इलेक्ट्रिक शक्तिशाली बॅटरी सोबत येते ज्याची मोटर 55 एचपी हॉर्स पावर जनरेट करते. या इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता ही 4000 किलो इतकी ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरचा ताशी वेग 30 किमी प्रति तास आहे. या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला पावर स्टेरिंग देण्यात आलेली आहे. हाय इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पाच तासाच्या सामान्य चार्जिंग आणि एक तासाच्या जलद चार्जिंग सह पूर्णपणे चार्ज होऊ शकतो. हा सेलस्टियल 4 WD म्हणजेच फोर व्हीलर ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची भारतातील किंमत हे पाच लाख रुपये एक्स शोरूम ठेवण्यात आलेले आहे.
5 ऑटोनेक्सट X35H2 ट्रैक्टर
ऑटोनेक्सट X35H2 या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला 20 KW क्षमतेची बॅटरी पाहायला मिळेल, जी या ट्रॅक्टर मध्ये 27 एचपी पावर जनरेट करते. या कंपनीचा हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 1400 किलो वजन वाहण्याची क्षमता ठेवतो. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये हायड्रोलिक पावर स्टेरिंग दिसू शकते. हा ट्रॅक्टर नॉर्मल चार्जिंग मध्ये आठ तासातआणि फास्ट चार्जिंग मध्ये दोन तासांमध्ये पूर्ण चार्ज होऊ शकतो. हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 2WD ड्राईव्हमध्ये येतो. भारतात या ट्रॅक्टर ची किंमत 2024 मध्ये सहा लाख रुपये एक्स शोरूम मध्ये ठेवण्यात आलेली आहे.
तर हे होती भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, किंमत आणि त्याचे वैशिष्ट्ये हे माहिती कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांशी नक्की शेअर करा. आणि माहिती आवडली असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा खाली लिंक दिलेली आहे.
https://chat.whatsapp.com/FFpaolSVU5ELkHKoWg0दणप
या लेख बद्दल तुमची माहिती कमेंट मध्ये नक्की कळवा.व इतर कुठल्या गोष्टीची तुम्हाला माहिती हवी आहे ते कमेंट मध्ये सांगा.