शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करायचे असेल तर त्याला शेती सोबतच इतरही जोड व्यवसाय करावा लागतो. मग तो पशुपालन,मत्स्यपालन,फुल उत्पादन,मधमाशी पालन असो इत्यादीचा अवलंब करू शकतो. पण अनेक वेळा योग्य माहिती अभावी हे सर्व अपयशी ठरते. आणि शासकीय योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतात तलाव बांधणी मत्स्य पालनासाठी अनुदानही दिले जाते. परंतु सर्व शेतकरी या योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करू शकत नाही त्यामुळे यापासून वंचित राहतात. अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही हा लेख घेऊन आलो आहेत. या लेख मध्ये अशी एक माशाची जात सांगणार आहोत, ज्याचे संगोपन घरच्या घरी खोल टाकीमध्ये करता येते. व त्यापासून तुम्ही पैसे कमवू शकतात.
ही आहे ती माशाची जात
आज आपण ज्या माशा बद्दल माहिती जाणून घेणार आहे त्या माशाचं नाव आहे “कतला ” हा मासा मांसाहारी लोकांचा सगळ्यात आवडता मासा मानला जातो, तसे पाहिले तर हा मासा खाण्यास खूप स्वादिष्ट असतो. त्यामुळे लोक याचा जेवणात मोठ्या उत्साहाने खाण्याचा आनंद घेतात. यामध्ये मस्या मध्ये प्रथिनांचे प्रमाण हे अधिक असल्याने नेहमी याची मागणी मोठ्या प्रमाणात असते.
हा माझा भारता व्यतिरिक्त बांगलादेश नेपाळ आणि पाकिस्तान मधील नद्या आणि स्वच्छ पाण्याच्या श्रोतांमध्ये आढळतो आणि तसेच भारतातील काही राज्यामध्ये भात शेतीमध्ये उत्पादन घेतले जाते. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.https://chat.whatsapp.com/B6Va6DHRKmBBLstT5RgiF3
कतला माशाचे वैशिष्ट्ये
- (Fish farming) कतला माशाचे वजन हे झपाट्याने वाढते.
- या माशाचे वजन एक वर्षात दीड किलो ते दोन किलो वाढते.
- या माशाची लांबी 1.75 मीटर
- हा माझा 25 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगल्या प्रकारे जगू शकतो.
- हा मासा गोड्या पाण्यात सापडतो व याची वाढ ही गोड्या पाण्यात योग्य प्रकारे होते.
अशा या साऱ्या वैशिष्ट्येमुळे शेतकरी आपल्या घरच्या घरी टाकीमध्ये याचे पालन करू शकतात. कतला हा झपाट्याने वाढणारा मासा असून त्याच्या चवीमुळे आणि पौष्टिकतेमुळे त्याला जास्त मागणी आहे. सध्या बाजार त्याची किंमत पाहिली तर दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो आहे. वर्ष शेतकऱ्याकडे शेती असेल तर तो तलाव बांधणी याचे पालन करू शकतो. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात नफा होईल.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.https://chat.whatsapp.com/B6Va6DHRKmBBLstT5RgiF3
सारांश
वरील लेख मधील माहितीवरून आपण एकच सारांश काढू शकतो, की ही माशाची जात गोड्या पाण्यात योग्य प्रकारे वाढते व महाराष्ट्रातील तापमान यासाठी योग्य प्रकारचे आहे.
वरील सर्व गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन करून या माशाचे संगोपन केले तर त्यापासून शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे उत्पादन भेटू शकते.
तर हा लेख तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की इतरांची शेअर करा.
जर तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने शेती करायची असेल तर त्याला आवश्यक असलेले साधने आणि मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही शेतकरी मित्र निखिल तेटू[+919529600161] यांच्याशी संपर्क साधू शकतात. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य तुम्हाला घरपोच मिळेल.