गेल्या वर्षी सुरु केलेल्या lek ladki yojana खूप कमी अर्ज पात्र ठरत आहेत. त्यासाठी राज्य सरकारने सर्व पालकांना आवाहन केले आहे की अर्ज दाखल करताना अर्ज हा नवीन निकषानुसार करावे.तर आता या योजनाची सविस्तर माहिती पाहू.
ऑगस्ट 2017 माझी कन्या भाग्यश्री ही सुरू केली होती,पण या योजनेला जनतेमधून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे या योजनेमध्ये बदल करून 2023 24 चा अर्थसंकल्पामध्ये lek ladki yojana [लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आली होती. ही योजना एक एप्रिल 2023 व त्यानंतर जन्मलेल्या लागू असणार आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर पालकांनी संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य नोंदणी करावी. व त्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकाकडे आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज दाखल करा.
आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्याचा जन्माचा दाखला
- कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे )
- तहसील चा दाखला आवश्यक आहे
- रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड ची झेरॉक्स )
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- पालकाचे आधार कार्ड
- पालकाचे मतदान कार्ड
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पेजची झेरॉक्स
- लाभार्थी शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळाचा दाखला
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
अशा प्रकारचे कागदपत्रे लेक लाडकी या योजनेचे लाभ घेण्यासाठी लागणार आहेत.
या योजनेच्या अटी व शर्ती
- या योजनेचे लाभ फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच असेल.
- ही योजना एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या येणारे एक अथवा दोन मुलींनाच लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
- लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील.
- लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- तसेच लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.
Lek ladki yojana मध्ये मिळणारे लाभ
- या योजनेमध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर 5000 हजार रुपये मिळतात.
- यानंतर मुलगी पहिलीत गेल्यावर 6000 हजार रुपये दिले जातात.
- नंतर मुलगी सातवीत गेल्यानंतर 7000 हजार रुपये दिले जातात.
- नंतर अकरावीत गेल्यानंतर 8000 हजार रुपये दिले जातात.
- व शेवटी अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये दिले जातात.
अशाप्रकारे राज्य सरकार लेक लाडकी या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये या योजनेअंतर्गत देते.
लेक लाडकी योजनेचे प्रमुख उद्दिष्टे (Objectives)
राज्यातील मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्म दर वाढवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. तसेच मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह थांबवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलीमध्ये असलेले कुपोषणाच्या प्रमाण कमी करणे, योग्य निकष आहार पुरवण्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत आहे आणि त्यांच्यातील शाळेतील उपस्थिती हे शंभर टक्के करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य सरकार लेक लाडकी योजना ही राबवत आहे.
लेक लाडकी योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका संबंधित पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
Conclusion
वाचक हो या पोस्टमध्ये लेक लाडकी योजनेबद्दल माहिती देण्यात आली आहे. जी माहिती, अर्ज करण्यास इच्छुक असलेले पालक व मुलींना उपयुक्त अशी आहे. ज्याच्यात लेप लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा, कुठे करावा, लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पात्रता नियम व अटी अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख नक्कीच आवडला असेल. हा लेख तुम्हाला महत्त्वाचा वाटत असल्यास तुमच्या मित्रांना व परिवारांपर्यंत नक्की शेअर करा.
लेक लाडकी योजना काय आहे ?
Ans. लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री या योजनेंचे सुधारित रूप आहे.
Q. lek ladaki yojana age limit?
लेक लाडकी योजनेसाठी 01 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीचे पालक अर्ज करू शकतात. तसेच 01 एप्रिल 2023 याच्या आधी जन्मलेल्या मुलीचे अर्ज 31 डिसेंबर 2023 पर्यंतकरू शकतात.
Q. lek ladaki yojana form?.
Ans. लेक लाडकी योजना फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड लिंक वरती उपलब्ध करून दिली आहे.
तरी अशा प्रकारचे निकष lek ladki या योजनेचे तरी सर्व निकष व्यवस्थितपणे पाहून अर्ज करावा ज्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ भेटेल.