महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. सध्याच्या वातावरणात व त्यावर विविध प्रकारचे रोग पडत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे मिरची पाने पिवळी पडणे, आता ही मिरच्यांची पिवळी पाने का पडतात व त्यावरील काय उपाय आहे. या लेखामध्ये सविस्तरपणे पाहू.
का पडतात मिरची पिवळी पाने
मिरचीचे पाने पिवळे पडण्याचे अनेक कारणे आहेत, पण थंडीचे दिवस सुरू झाले आणि मिरच्यांची एक दोन वेळेस तोडणी झाली,मिरच्यांची पाने पिवळी पडायला सुरुवात होते. आता याची कारणे सविस्तर पाहू.
- मिरचीचे पाणी पिवळे पडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मिरचीच्या झाडांना “नायट्रोजनची” कमतरता भाषणे.
- दुसरे कारण आहे मिरचीच्या झाडावर बुरशी लागणे,यालाच फंगस लागणे असे म्हणतात.
- तिसरे कारण आहे मिरचीच्या पिकावर व्हायरस पडणे.
- चौथे कारण आहे मिरचीच्या प्लॉटला जास्त पाणी देणे.
- व शेवटचे कारण आहे, वातावरणात सध्या होत असलेल्या मोठ्या प्रमाणात बदल कधी खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडते तर कधी पावसाचे जास्त प्रमाणामुळे
- मिरच्यांच्या झाडांना सल्फर ची कमतरता झाल्यामुळे मिरच्याची पाने पिवळे पडतात.
या सर्व कारणामुळे मिरच्यांची पाने ही पिवळी पडतात. आता सर्व या कारणांचे आपण उपाय पाहणार आहोत.
उपाय
- ज्यावेळेस शेतकरी मिरचीची लागवड करतो, त्यावेळी शेतामध्ये शेतकरी युरिया खताचा वापर करत नाही, यूरिया खात्याचा वापर न केल्यामुळे नायट्रोजनची कमतरता शेतामध्ये होते, त्यामुळे पाणी मिरचीची पाने पिवळी पडू लागतात. तर यावर उपाय शेतकऱ्यांनी ज्यावेळेस मिरची लागवड करत आहे. त्यावेळी शेतामध्ये यूरिया खात्याचा वापर करावा, कारण यूरिया खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे मिरच्यांच्या झाडांना नायट्रोजनची कमतरता भासणार नाही व मिरचीची पाने पिवळी पडणार नाहीत.
- यानंतर शेतकरी नी त्याच्या झाडावर जर फंगस (बुरशी) झाले असेल. तर शेतकऱ्यांनी त्यावर “Carbrio top” या औषधाची फवारणी करावी, यामध्ये फाईटो टॉनिक इफेक्ट असल्यामुळे हे मिरचीचे पाने हिरवी करते. दुसरी औषध आहे, “tridium” हे औषध यूपीएल कंपनीचे आहे. ही एक उत्तम बुरशीनाशक म्हणून ओळखले जाते.
- ज्यावेळेस मिरचीच्या झाडावर वायरस पडते. त्या अगोदर त्या झाडावर एक प्रकारचे किडे पडतात. ही किडे मिरचीच्या पाना मधल्या रस शोषून घेऊन त्या पानांमध्ये असलेला क्लोरोफिल हे संपवून टाकतात. त्यामुळे अशा मिरचीच्या झाडावर वायरस हे अटॅक करतात. तरी यासाठी मिरचीचे झाडावर कीटक दिसल्यानंतर एक उत्तम प्रकारचे कुठलेही कीटनाशक वापरावे. त्यामुळे झाडांच्या पानांमधील क्लोरोफिल कमी होणार नाही.
- मिरचीच्या झाडांना अति प्रमाणात पाणी देण्यात येऊ नये,ज्यावेळेस मिरचीच्या पिकांमधील जमीन हे कोरडी होईल त्यावेळेस त्याला पाणी देण्यात यावे, अन्यथा मिरची पाने हे पिवळी पडतील.
ज्यावेळेस मिरचीची लागवड केली जाते, यूरिया सोबतच सल्फर या खताचे पेरणी करावी, कारण मिरच्यांच्या सल्फर ची कमतरता झाल्यास प्रथिनांची योग्य प्रकारे वाढ होत नाही त्यामुळं मिरच्यांची पाने पिवळी पडतात.
तर हे होते मिरच्याची पिवळी पाने पडण्याची कारणे व त्यावरील उपाय.