Neem insecticide: असे बनवा कडुनिंबा पासून शक्तिशाली सेंद्रिय कीटकनाशक

कडूलिंबाच्या कीटकनाशकाचे फायदे : कडुलिंब हे औषधी गुणधर्मामुळे, भारतात प्राचीन काळापासून औषधी बनवण्यासाठी तसे रोगावर उपचार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कडुनिंबात असलेल्या औषधी गुणधर्मामुळे, काहीजण या कडुलिंबाला आमृत देखील पदवी देतात. कडुलिंबाच्या झाडाची साल,पाने, फांद्या,मुळे आणि अगदी फळापासून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वापरले जातात, पण तुम्हाला माहित आहे,का कडुलिंबाच्या शेतीत वापर करून देखील हजारो  रुपयाची तुम्ही बचत करू शकतात. होय कडूनिंबापासून बनवलेले कीटकनाशक हे केवळ कमी खर्चात पिकातील कीटकाचे  मारून टाकत नाही तर त्या पिकांना पोषण देखील देते. हे जे कडीलिंबाच्या कीटकनाशक आहे हे शेतकऱ्यांसाठी व पिकासाठी तर फायदेशीर आहेच, तो शेतकऱ्यासाठी एक फायदेशीर व्यवहार आहे. आता या लेखामध्ये आपण या कडूलिंबापासून कसे कीटकनाशक बनवायचे त्याचे फायदे काय आहेत, याची सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत.

 असे बनवा कडूनिंबापासून कीटकनाशक

कडुलिंबापासून बनवलेले कीटकनाशक हे गावात घरगुती कीटकनाशक म्हणून  ओळखले जाते. तर बरेच शेतकरी विषारी रसायन्याऐवजी केवळ कडुनिंबाची कीटकनाशक शेतामध्ये वापरतात. कडुनिंबापासून कीटकनाशक कसे बनवायचे हे जाणून घेऊ.

  1.  आता कडुलिंबापासून सेंद्रिय कीटकनाशक तयार करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला एका मोठ्या बॅरल मध्ये 10 लिटर पाणी घ्यायचं आहे.
  2.  यानंतर तुम्हाला तुमच्या शेतातील कडुलिंबाची पाणी तोडून घ्यायचे आहेत व त्यांना स्वच्छ धुवायचे आहेत, त्यानंतर त्यांना काही वेळात उन्हात वाळवून बारीक करून घ्यायचा आहे. तसेच निंबोळी घ्यायची आहे आणि त्यालाही बारीक करून घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण तुम्हाला दहा लिटर पाण्यामध्ये टाकायचा आहे.
  3.  हे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर मोठी काठीने या मिश्रणाला पूर्ण हलवायचा आहे. यामुळे मिश्रण हे पाण्यामध्ये योग्य प्रकारे मिसळेल.
  4.  आता हे द्रावण एका मोठ्या बॅरलमध्ये झाकून ठेवा आणि वेळोवेळी काटे च्या साह्याने त्याला हलवत रहा.
  5.  यानंतर तुम्ही याद्रावणाचा रंग दुधाळ होईल तेव्हा त्या दोनशे मिलिग्रॅम सावर आणि 80ml घालून चांगले मिश्रण हलवा.
  6.  आता हे कीटकनाशक तयार झालेले आहे तर यासाठी आता एक स्वच्छ कापडाच्या साह्याने हे कीटकनाशक तुम्ही स्वच्छ गाळून घ्या.

आता हे तयार झालेले कडुलिंबाच्या पानापासून तयार झालेले कीटकनाशक कुठल्याही पिकाला न घाबरता कुठलेही साईड इफेक्ट न होता वापरू शकतात.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/IzMBr8x1hI8CqEmwxsHxxo

 कडुलिंबाच्या कीटकनाशकाचे फायदे

  •  कडुलिंबाची कीटकनाशक नैसर्गिक साधनाच्या साह्याने सेंद्रिय पद्धतीने पूर्णपणे तयार केल्यामुळे दीपिकांसाठी आणि मातीसाठी दोन्ही साठी फायदेशीर ठरते.
  •  हवामानातील बदलामुळे पिकावर वेगवेगळे कीड प्रादुर्भाव होत आहे. परंतु कडुलिंबाच्या कीटकनाशकाचा वापर केल्याने या किडीसह रोगही निघून जातो.
  •  आपण शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर कडूलिंबाच्या कीटकनाशकाचा वापर केल्यावर तो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. शेतात फवारलेले  रासायनिक औषधे  पिकासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी खूप घातक असतात.
  •  पण कडुलिंबाच्या कीटकनाशक मुळे केवळ पीक आणि शेतकऱ्यांसाठी फायदे नसून ते शेतकऱ्यांचे पैसे मोठ्या प्रमाणात वाचवते.
  •  दिवसेंदिवस रासायनिक औषधाच्या वापरामुळे शेतातील पोषक द्रव्य हे मरत आहेत. तुम्ही जर ह्या कीटकनाशकाचा वापर केलात तर जमिनीवर कुठल्याही  प्रकारचा साईड इफेक्ट न होता जमिनीची पोषकता हे वाढल.
  •  शेतकऱ्याचे जे मोठ्या प्रमाणात औषध कंपन्या फसवणूक करत आहेत तेही होणार नाही.
  •  रासायनिक औषधाच्या फवारणीमुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तर कडुलिंबाच्या कीटकनाशकामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही.
  •  सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी झाड तोडत आहेत. अशाप्रकारे या झाडाचा उपयोग केल्यानंतर शेतकऱ्यांना लिंबाच्या झाडाचे महत्त्व पटेल व शेतकरी मोठ्या प्रमाणात हे झाडे लावतील.

तर हे अशा प्रकारचे फायदे कडुनिंबाच्या कीटकनाशकाचे होते. ही माहिती कशी वाटली तुम्हाला हे जर आवडली असेल तर इतरांशी नक्की शेअर करा.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/IzMBr8x1hI8CqEmwxsHxxo

जर तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने शेती करायची असेल तर  त्याला आवश्यक असलेले साधने आणि मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही शेतकरी मित्र निखिल तेटू[+919529600161] यांच्याशी संपर्क साधू शकतात. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य  तुम्हाला घरपोच मिळेल

 

Leave a Comment