organic khat : असा बनवा लसूण आणि कांद्याच्या पाचोळेपासून सेंद्रिय खत

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा वापर होत आहे.  त्यामुळे शेतीची नापीकता वाढत आहे, आणि वर्षानुवर्ष शेतीमध्ये रासायनिक खताच्या  अतिवापरामुळे  जमिनीची सुपीकता ही मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. यापासून जर शेतकऱ्याला जमिनीला वाचवायचा असेल. आणि शेतीची उत्पादकता वाढवायचे असेल तर त्याला पर्याय आहे सेंद्रिय खत (organic khat )  या लेखामध्ये आपण कांद्याच्या व लसणाच्या पाचोळ्या पासून कसा सेंद्रिय खत तयार करायचे हे सविस्तर पाहणार आहोत.

 सेंद्रिय खत वरदान

सेंद्रिय खत हे शेतीसाठी एक वरदान मानले जाते याचं कारण आहे, सेंद्रिय खतामुळे शेताची सुपीकता तर वाढतेच. पण शेतीची उत्पादन देण्याची क्षमता आहे, ते वर्षानुवर्ष वाढत राहते आणि जमिनीचे प्रदूषण होत नाही. यामुळे आजकाल सेंद्रिय खताकडे लोकांचा कल वाढत आहे. सेंद्रिय खतामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात, ज्यामुळे पिकाला खूप फायदा होतो. आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा व लसणाचे उत्पादन होते, पण त्यापासून तयार होणाऱ्या पालापाचोळा आपण फेकून देतो. परंतु त्यापासून आपण उत्तम प्रकाराचा सेंद्रिय खात तयार करू शकतो. हे खात आपण बनवून जेव्हा शेताला टाकतो त्यावेळेस शेताची उत्पादकता आणि पिकाची उत्पादकता ही वाढते.

 सेंद्रिय खतसाठी सामग्री

लसणाच्या व कांद्याच्या पाचोळ्या पासून सेंद्रिय खत बनवण्यासाठी तुम्हाला या गोष्टीची व्यवस्था करावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम कांदा व लसणाच्या पाकळ्यांचा  पाचोळा घ्यायचा आहे, त्यानंतर  शेण आणि पाणी या सामग्रीची गरज असेल. जर तुमच्याकडे इतरही भाजीपाल्याचे पाने असतील, तर तुम्ही यामध्ये टाकू शकतात.

 असा बनवा सेंद्रिय खत

  •  सर्वात अगोदर तुम्हाला कांद्यावर लसणाचे पालापाचोळा  किंवा त्यांचे साल एकत्र करायचे आहेत, आणि त्यांना उन्हामध्ये वाळू घालायचे आहे. त्यांना चांगल्या प्रकारे उन्हात वाळू दिल्यानंतर
  •  एका मोठ्या बॅरेल मध्ये पाणी टाकून शेणाचे मिश्रण करायचे आहे. व त्याला भिजत ठेवायचा आहे, असे केल्यामुळे ते व्यवस्थितपणे मिश्रण तयार होईल.
  •  यानंतर काही वेळाने यामध्ये जे आपण कांदा व लसणाचा पालापाचोळा (साली)वाळू घातला होता. तो यामध्ये टाकायचा आहे.व चांगल्या प्रकारे हलवून याचे एक मिश्रण तयार करायचा आहे.
  •  यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. कारण हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र झाली पाहिजे.
  • आता हे मिश्रण तुम्ही काही दिवस ठेवल्यानंतर त्याच्यापासून एक उत्तम प्रतीचा खात तयार होईल.

अशाप्रकारे  लसणाच्या व कांद्याच्या पातोळ्या पासून सेंद्रिय खत तयार करू शकतो. हा जो खात आहे तुम्ही आपल्या शेतीसाठी जर वापर केला, उत्पादकता तर वाढलच. पण सध्या जे शेतीच्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे ते पण थांबेल. कारण रासायनिक खताचा वापर जर अशाच प्रकारे केला. तर येणाऱ्या पिढ्यांना शेतीही पिकवण्यासाठी योग्यच राहणार नाही.

सेंद्रिय खताच्या वापर करून उत्पादन घेतल्याने जे तयार होणार अन्नधान्य हे विषमुक्त असेल. व त्यामुळे शेतकऱ्यांना व इतर लोकांनाही कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही.

सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना जी रासायनिक खतासाठी लागणारे पैसे आहेत. त्याची पण बचत होईल. शेतकऱ्यांचा उत्पादकता  खर्च  हे कमी होईल. व शेतकरी हे नफ्यामध्ये राहतील. कारण आजकाल शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचे भाव वाढले,असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. ज्यामुळे उत्पन्न खर्च जास्त आणि उत्पादकता कमी असे चित्र तयार झाले आहे.

तर ही होती सर्व सेंद्रिय खता बद्दलची माहिती आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च आणि उत्पादकता यांचा आढावा. तुम्हाला हा लेख कसा वाटला आवडला असेल तर नक्की इतरांची शेअर करा. कारण कारण शेतीची उत्पादकता ही वाढली पाहिजे, त्यासोबत शेतकरीही नफ्यामध्ये राहिला पाहिजे. खरच भारत हा खरा कृषीप्रधान देश ठरेल. व सगळ्या जगाला दाखवून देईल की रासायनिक खताचा वापर न करताही शेतीमध्ये उत्पन्न वाढू शकते.

साऱ्या शेतकऱ्यांचे व जगाचे आरोग्य हे सुधारू शकते. हे तेव्हाच शक्य आहे,ज्यावेळी शेतकरी आपल्या शेतीचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करेल आणि जमिनीची उत्पादकता वाढवण्यासोबतही सुपीकतेवर भर देईल. आज देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात याची लोकांना कल्पना झाली आहे आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उतरत आहेत. ऑरगॅनिक शेती करून मोठ्या किमतीने हे आणि अन्नधान्य विकत आहेत.

आता शेतकऱ्यांनी ही जाग व्हायचं आहे आणि आपली शेती पण जपायची आहे आणि शेतीमाल ही सेंद्रिय तयार करून मोठ्या किमतीमध्ये विकायचा आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा परत एकदा राज्य येईल. आणि शेतकऱ्याला ही सर्व जगामध्ये मान मिळेल.

सेंद्रिय खत फक्त कांद्याच्या व लसणाच्या पाचोळापासूनच नाही, इतर तरीही गोष्टीपासून बनवता येतो. या सर्व गोष्टींचा उपयोग करून सेंद्रिय खत तयार करायचा आहे. व रासायनिक खताला जाणारे पैसे वाचवायचे आहेत.

Leave a Comment