PM KUSUM YOJANA: सावधान शेतकऱ्यांनो पंतप्रधान कुसुम योजनेमध्ये निवड झाली अशी फसवे मेसेज (msg) येत आहेत.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना PM KUSUM YOJANA ( पंतप्रधान कुसुम योजना ) अंतर्गत आपली निवड झाली आहे. असे संदेश(MSG) पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक सध्या सुरू आहे. पण ही आश्चर्याची गोष्ट आहे अशा फसव्या मेसेज पाठवणाऱ्या लोकांकडे शेतकऱ्याची माहिती जाते कशी, अशा सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे. या अशा फसवणूक पाठवणाऱ्या मेसेजच्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागा मार्फत सौर कृषीपंप घेण्यासाठी पंतप्रधान कुसुम सोलार योजना अंतर्गत  अनुदान देण्यात येत आहे.

महाऊर्जेतून आतापर्यंत साधनता 75 हजार सौर कृषी पंप बसवले आहेत. मात्र काही दिवसापासून असे निदर्शनास आले आहे. पंतप्रधान कुसुम योजनेचे पोर्टल जसे आहे. तसेच हुबेहूब पोर्टल बनवण्यात आलेले आहे, ती पूर्णतः बनावट आहे. व या पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना सर्वेक्षण करण्यासंदर्भात कसवे मेसेज पाठवले जात आहे. विशेष महा ऊर्जा कडे शेतकरी जेव्हा अर्ज करतो त्यावेळेस त्याचा दहा अंकी एम के नंबर, मोबाईल,नंबर पत्ता व आधार नंबर ही माहिती दिली जाते.

तर ही सर्व माहिती नकली मेसेज पाठवणाऱ्या संकेतस्थळ वर उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता असा प्रश्न पडला आहे की फक्त शेतकऱ्यांकडे आणि  प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना हॉटेलवर असलेली माहिती या फसव्या लोकांकडे कोण पाठवत आहे किंवा कशी गेली. असे संकेतस्थळ शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत आहेत.

या संदर्भात राज्य सरकारने लक्ष घालून या ज्या नकली पोर्टल आहेत किंवा असे फसवे मेसेज पाठवणाऱ्या लोकांची चौकशी करून लवकरात लवकर अशा लोकांना पकडण्यात यावे. कारण अशी माहिती जे सरकारकडे आहे ते अशा लोकांकडून कोण पाठवते,का यामध्ये कुठल्या सरकारी अधिकाऱ्यांचा हात आहे, सर्व गोष्टीची सरकारने लवकरात लवकर चौकशी केली पाहिजे.ज्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

शेतकऱ्यांनी ही सर्व माहिती कुठल्याही व्यक्तीकडे शेअर करू नये. व असे मेसेज आल्यानंतर सर्व गोष्टीची योग्य चौकशी करून पुढील प्रोसिजर करावी.

 

Leave a Comment