Shetkari: राज्यात राबवणार शेतकरी समृद्धी मिशन हवामान तज्ञ अशोक तोडकर

आंतरराष्ट्रीय बाजार सोयाबीनचे उत्पादन घट असूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. कांदा निर्यात बंदी लावून कांद्याचे भाव पाडले आहेत कापसाची परिस्थिती तीच आहे. या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे सरकारचे चुकीचे धोरण येत्या निवडणुकीमध्ये विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाणी पुसले आहे.पण आता महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला दाखवणार एकीचे बळ, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासात श्री अशोक तोडकर राज्यभर मध्ये राबवणार शेतकरी समृद्धी मिशन. याबद्दलची सर्व माहिती यावेळी या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. काय आहे शेतकरी समृद्धी मिशन

 राज्यातील शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती शेतकरी देत आहेत.

या मिशनमध्ये प्रत्येक जिल्ह्यात तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळे मार्फत प्रतिनिधीची निवड करण्यात येणार आहे. तसेच तालुका पातळीवर व गाव पातळीवर प्रतिनिधी निवड युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या 45 दिवसात हे काम पूर्ण होणार आहे.

अशी माहिती प्रसिद्ध हवामान तज्ञ अशोक तोडकर यांनी व्यक्त केली आहे.

 हे आहेत शेतकरी समृद्धी योजनेचे उद्दिष्टे

  •  राज्यभरातील शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या शेतमालाला सरकारकडून योग्य भाव प्राप्त करून घेणे.
  •  खत बियाणे कीटकनाशके यांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीवर नियंत्रण आणणे.
  •  तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेवर देण्यासाठी सरकारला भाग पाडणे.
  •  शेतकरी हिताचे धोरण राबवण्यासाठी सरकारचा भाग पाडणे.
  •  शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी त्याला आवश्यक असलेल्या साधनांची योग्यरित्या पुरवण्याकरता योजनाची योग्य अंमलबजावणी करण्याकरिता सरकारला भाग पाडणे.
  •  अर्थसंकल्पामध्ये कृषीसाठी केलेल्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यास भाग पाडणे.

 हे मिशन राबवण्याचे कारण

राज्यातील शेतकरी संघटित नसल्यामुळे सरकारी आपल्या मनाचे निर्णय घेत आहे. व त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. या निर्णयामध्ये शेतकऱ्याचे हित नसून सरकार हे त्यांचे मतं कसे वाढवता येईल या गोष्टीचा विचार करून निर्णय घेत आहे. आशा निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

तर अशा सरकारच्या मनमानी निर्णयाला लगान लावण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलेला आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन. आपल्या हक्कासाठी लढण्याची आता गरज आहे.

तर हे माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की इतरांशी शेअर करा. व अशा शेतकरी संबंधित  माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा.

Leave a Comment