Shetkari aatmhatya :संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत,असल्याची बाब समोर आली आहे.मागील महिन्यामध्ये आलेल्या NCRB च्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये 11,290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जे 2021 मध्ये केलेल्या आत्महत्या पेक्षा 3.75 टक्क्यांनी वाढ आहे. 2021 मध्ये 10,881 शेतकरी व शेतकरी मजूर यांनी आत्महत्या केली होती. तर या लेखा मध्ये आपण शेतकरी आत्महत्येचे सविस्तर कारणे पाहणार आहोत.
NCRB रिपोर्ट 2022
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो(NCRB) च्या 2022 मधील भारतातील आत्महत्याच्या अहवाल मध्ये 2021 मध्ये 10,881 शेतकरी आणि शेतमजुराच्या तुलनेत 2022 मध्ये 11,290 शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये देशात सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये 4,248 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर कर्नाटक आणि आंध्रप्रदेश चा नंबर लागतो.
कृषीप्रधान भारत
साऱ्या जगामध्ये भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण शेतकऱ्याची अवस्था पाहिली आणि त्याच्या होत,असलेली दुर्दशा पाहून या देशाला कृषीप्रधान देश म्हणून घेण्याची लाज वाटत आहे.
शेतकरी आत्महत्येचे कारणे
- शेतकऱ्यावरील कर्ज : शेतकऱ्याचे आत्महत्या करण्यास सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यावर वाढलेला कर्जाचा बोजा हे कर्ज वाढण्याचे कारण आहे, शेतामध्ये कष्ट करून त्याला रोजच्या गरजा भागतील एवढेही उत्पन्न निघत नाही,त्यामुळे शेतकऱ्यावरील कर्ज हे वाढत जाते आणि एक वेळ अशी येते की त्याला ते कर्जाचा डोंगर जीवन संपवण्यास भाग पाडतो.
- शेतमालाच्या घटत्या व स्थिर किमती : सध्या आपण पाहतच आहोत सोयाबीनचा भाव 5000 च्या पुढे जायचं नाव घेत नाही आणि कांद्याचा भाव कसातरी वाढला होता, सरकारने त्यावरही निर्यात बंदी लावली आणि त्याचेही भाव पाडले. आता हे व्यापारी कमी भावात कांदा खरेदी करणारा आणि ज्यांचा नफा वाढवणार. तर अशा प्रकारच्या किमतीमधील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना कुठल्याच पिकाला योग्य भाव मिळत नाही. याचा परिणाम त्याचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी असे गणित हे फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीतच घडते. इतर सर्व वस्तूच्या किमती हे त्यांचे उत्पादक ठरवतात. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत असे घडत नाही आणि शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने विकला जातो. अशा अस्थिर किमतीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय काय आहे. कारण सरकार तर त्यांच्या पार्टी फोडण्यात आणि पार्टी जोडण्यात व्यस्त असतो त्यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही.
- नोकरशाहीची दिरंगाई : शेतकरी हा जास्त शिकलेला नसतो किंवा त्याला नवीन घडामोडीचा अंदाज नसतो.त्यामुळे सरकारने काढलेल्या नवीन योजनां त्याच्यापर्यंत कधी लाभ पोहोचतच नाही. कारण या योजना शेतकऱ्यापर्यंत घेऊन जाण्याचे काम सरकारी नोकरदारांचे असते. पण त्यांच्या अनु उत्सुकता आणि काम कंटाळ्यामुळे या योजनेचा शेतकरी प्रत्यक्षात लाभच घेऊ शकत नाही.
- शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या वाढत्या किमती : शेतकऱ्याच्या शेतमालाच्या किमती वाढल्या नाहीत, पण शेतीसाठीचे अवजारे असतील तसेच शेतमजूर असतील यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादकता खर्च वाढला आहे. उत्पन्नात कुठलीही भर न पडल्यामुळे शेती व्यवसायात त्याला मोठ्या नुकसान होत आहे.
- निसर्गाचा लहरीपणा : सरकाराच्या लहरीपणा तर वाढलाच आहे. पण त्यासोबतच निसर्गही शेतकऱ्यांना साथ देत नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस पडत नाही आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे. कारखानदारी आणि इतर गोष्टीमुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे वाढलेल्या तापमानामुळे शेतीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
- अपुरा वीज पुरवठा : उद्योगाला 24 तास वीज पुरवठा केला जातो,पण शेतीला 8 तास व्यवस्थित वीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकालाही पाणी देऊ शकत नाही. परिणामी त्याचे उत्पादन घटते.
- बी बियाणे कंपन्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक : शेतकऱ्यांची बी बियाणे कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे किंवा बोगस खात पुरवला जातो. ज्यामुळे पीक योग्य येत नाही किंवा पिकच येत नाही,त्यामुळे त्यांचा खर्च वाढतो आणि परत त्यांना दुसरे बियाणे पेरावे लागते.
- बँका शेतीला कर्ज पुरवठा देण्यात दिरंगाई :शेतकऱ्याला कर्ज द्यायचं म्हणलं की बँकांच्या जीवावर येते. बँका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कागदपत्र गोळा करायला लावतात. आणि काहीतरी कारण काढून शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी कुठल्यातरी खाजगी कर्जदाराकडून कर्ज घेतो व त्याचे व्याजदर हे खूप जास्त असल्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर तयार होतो.
- यासोबतच शासनाच्या अयोग्य धोरण,अपुऱ्या सिंचनसुविधा, हे महत्त्वाचे कारणे शेतकरी आत्महत्या करण्यास आहेत.
शेतकरी आत्महत्या थांबवायचे असेल तर सरकारला हे उपाय करावे लागतील.
- शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य किंमत देण्यात यावी. हे किंमत फिक्स ठरली पाहिजे.
- शेतकऱ्यांना सहज, स्वस्त, वेळेवर व पुरेसे कर्ज उपलब्ध झाले पाहिजे .
- शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे.
- शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करायला हवे.
- जलसिंचन सुविधांमध्ये वाढ करायला हवी.
- शासकीय योजनांचे प्रभावीपणे अंमलबजावणी करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारापर्यंत हे योजना पोहोचल्या पाहिजे.
- आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन,त्यांचे उत्पन्न वाढवण्यास सरकारने मदत केली पाहिजे.
- शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा.
- कृषी पीक विमा योजनेतून योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी.
- हवामान खात्याने अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करावा.
- वायदे बाजाराची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी.
- शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षणासाठी कुठलीही फीस घेण्यात येऊ नये.
- शेतकऱ्यांना सर्व आरोग्य सुविधा हे मोफत दिल्या पाहिजे.
या सर्व गोष्टीचा सरकारने बारकाईने अभ्यास करून अंमलबजावणी करावी, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होणार नाही.
सारांश
शेतकरी आत्महत्या ही केवळ शेतकऱ्यांची समस्या नसून हे सगळे जगाची समस्या आहे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. भारतात विशेषता महाराष्ट्रात या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या नाहीत, हे यावरून सिद्ध होते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीशिवाय सर्वकष प्रयत्न करणे याशिवाय आत्महत्या कमी करण्याचा दुसरा प्रभावी उपाय नाही. भारताला आर्थिक महासत्ता करायच असेल तर अन्नदाता जपला पाहिजे.
“Shetkari aatmhatya : शेतकरी आत्महत्या च्या बाबतीत देशात महाराष्ट्र एक नंबर” हा लेख इतका शेअर करा की सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे.
तसेच सेंद्रिय शेती संदर्भात मार्गदर्शन हवे असेल तर यांच्याशी संपर्क साधू शकतात.शेतकरी मित्र निखिल तेटू[+919529600161]
1 thought on “Shetkari aatmhatya : शेतकरी आत्महत्या च्या बाबतीत देशात महाराष्ट्र एक नंबर”