Urea Gold:यूरिया गोल्ड खाताला सरकार चा हिरवा कंदील?

Urea Gold: सरकारने सल्फर कोटेड युरियाला “यूरिया गोल्ड “या नावाने बाजारात आणण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. रसायन आणि खत मंत्रालयाच्या खत विभागाने खत उत्पादक कंपन्यांना सांगितले आहे की त्याची किंमत जीएसटी सह 266.50 ठेवण्यात यावी. काय आहे सल्फर कोटेड यूरिया याची सविस्तर माहिती या लेख मध्ये आपण पाहणार आहोत.

काय आहे सल्फर कोटेड युरिया

युरिया गोल्ड या खताची निर्मिती करते वेळेस नायट्रोजन सोबत सल्फर चे मिश्रण करण्यात आले आहे. यामध्ये 37% नायट्रोजन(N) आणि 17% (S) सल्फर चे मिश्रण करण्यात आले आहे. सामान्यता युरिया मध्ये फक्त नायट्रोजन याचा वापर केला जातो.

सल्फर वनस्पती साठी खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. सल्फर मुळे वनस्पतीमध्ये प्रथिने तयार करण्यास मदत होते व त्याचे रोगापासून संरक्षण करते.

युरिया गोल्ड चे फायदे

सामान्यता युरिया खताचा वापर केल्यानंतर शेतातील नायट्रोजनच्या कमतरतेची पूर्णता होते. व त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. पण आता नायट्रोजन सोबतच या युरियामध्ये सल्फर या घटकाच्या समावेश केल्यामुळे जमिनीमधील सल्फर ची कमतरता पूर्ण होईल व त्यामुळे आणखी शेतकऱ्यांचे उत्पादकता वाढण्यास मदत होईल. तसेच शेतीमध्ये वाढलेले युरियाच्या प्रमाणामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होता आहे आता त्यात मध्ये सल्फर चे प्रमाण वाढवल्यामुळे नायट्रोजनचे प्रमाण कमी होईल व शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होईल.

मुख्यतः सल्फर हे वनस्पती मध्ये प्रथिने तयार करण्याच्या उपयोगी येते, जर वनस्पतीमध्ये योग्य प्रथिने तयार झाली तर ते वनस्पती रोग प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे तयार करते व पिकाचे पासून संरक्षण होते.

याचा शेतकऱ्यांना तोटा

युरिया गोल्ड चे पोते हे 40 किलोचे असणार आहे. पण याची किंमत 45 किलोच्या नीम कोटेड युरियाच्या इतकी असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना 45 किलोच्या पोत्याची किमतीत 40 किलो खत मिळणार आहे.

युरिया गोल्ड मुळे जमिनीवर होणारे परिणाम (Urea Gold)

या मध्ये सल्फर चे मिश्रण केले असल्यामुळे नायट्रोजन जीवन वाढते. सध्याचे एरियाला हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे युरियाचे आयुष्य वाढेल व ज्यामुळे हे ते 20 किलो एरिया लागणार होतात तिथे आता 15 युरिया पुरेसा असेल. सल्फर मिश्रित युरियामुळे जमिनीच्या आरोग्य सुधारणार आहे. तसेच शेतकरी ना पोषक तत्वांचा पुरापूर लाभ घेऊन आपले उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. तर सल्फर मिश्रित युरियामुळे पर्यावरणाला पण मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment